
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने २०२२ चे पुरस्कार जाहीर झाले असून तालुका प्रतिनिधी विभागातून दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अशपाक सय्यद तर ग्रामीण पत्रकारिता विभागातून वाशिंबे येथील दिव्य मराठीचे पत्रकार सुयोग झोळ, तसेच साप्ताहिक वृत्तपत्रामधून सचिन जव्हेरी व ग्रामीण पत्रकारिता मधून नागेश चेंडगे यांना जाहीर करण्यात आले आहेत.
सात जानेवारी रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत टीव्ही नाईनचे अँकर विलास बडे यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
२०२१ मध्ये करमाळा तालुका पत्रकार संघाने जाहीर केलेले पुरस्कार कोरोना काळामुळे देण्यात आले नव्हते. त्यामुळे २०२१ मध्ये पुरस्कार प्राप्त असलेले दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी अण्णा काळे, काय सांगता न्यूज पोर्टलचे संपादक अशोक मुरूमकर, साप्ताहिक करमाळा चौफेरचे संपादक शंभूराजे फरतडे व ग्रामीण भागातील दैनिक सकाळचे पोथरे येथील पत्रकार नानासाहेब पठाडे यांचा ही सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
करमाळा सारख्या भागातून टीव्ही नाईन या राज्यस्तरीय चैनल वर पत्रकार म्हणून काम करणारे शितल कुमार मोटे यांचाही विशेष सन्मान म्हणून सत्कार करण्यात येणार आहे.




