-->
करमाळासामाजिक

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ कामगारांचा होरपळून मृत्यूतर जखमींवर उपचार चालू

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथील स्फोटानंतर दुपारी सोलापूर जिल्ह्यात भयानक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ६-७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २५ जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत फटाक्याचा कारखाना आहे. या ठिकाणी आज रविवार दि. ०१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी बार्शीतील अग्निशामक दल व पोलीसही दाखल झाले आहेत.

मोठ्या प्रमाणावर आग लागल्यामुळे मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close