
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


केत्तूरचे माजी सरपंच, करमाळा तालुका वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲड. अजित विघ्ने यांची जिल्हापरिषद सोलापुर, करमाळा पंचायत समितीच्या कायदेविषयक सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड सोलापूर जिल्हा परिषद मार्फत करण्यात आली असून या अगोदर कै. ॲड. ज्ञानदेव देवकर हे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कायदे विषयक सल्लागार म्हणून कामकाज पाहत होते.
ॲड. विघ्ने हे करमाळा न्यायालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कायदेविषयक कामकाज पाहणार आहेत. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे. आ. संजयमामा शिंदे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही या निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ॲड. अजित विघ्ने यांनी यापुर्वी जलसंपदा विभाग, स्टेट बँक ऑफ इंडिया, भैरवनाथ शुगर्स वर्क्स लि. विहाळ यांचेही कायदे विषयक सल्लागार म्हणुन काम पाहीलेले आहे.



