
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा येथील नोबल इंग्लिश स्कूल मध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान समजणे काळाची गरज आहे हे लक्षात घेता विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना नाणे, नोटा, व्यवहारिक चलन तसेच नफा तोट्याची गणिते नकळतपणे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली गेली. खरेदीसाठी पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसेच सिनियर केजी मधील कु. अनन्या पवार या विद्यार्थिनीने “मोठ्यांचं काही कळतच नाही” ही एकांकिका सादर केली.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी करमाळा गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, यश कल्याणी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश भाऊ करे पाटील, डॉ. अंजली श्रीवास्तव मॅडम, ॲड. सविता शिंदे मॅडम, ॲड. माया जाधव मॅडम, डॉ. निशा सारंगकर मॅडम, डॉ. नेटके मॅडम, समाजसेविका माधुरी परदेशी मॅडम, उद्योजिका चंद्रकला मारकड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या एकतपुरे यांनी केले. प्रास्ताविक रजनी साळुंके यांनी तर आभार प्रशालेच्या संस्थापिका सौ. असादे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. मनीषा कांबळे, मेघा कांबळे, सौ. शितल शिंदे, सौ. जगताप मंगल, रजिया मोमीन आणि सौ. कोमल लांडगे या शिक्षकांनी केले.




