-->
करमाळाराजकियसामाजिक

ठोस आश्वासनानंतर युवासेनेचे आंदोलन मागे; जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे काढले वाभाडे

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

हिसरे येथील पुलाची उंची वाढवणे व फिसरे ते कोळगाव रस्त्यावरील खड्डे बुजवून द्यावेत या मागणी साठी युवा सेनेच्या वतीने आज फिसरे ता करमाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळेस शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, हिसरे येथील माजी सरपंच बाळासाहेब पवार, ऋषिकेश चव्हाण, फिसरे येथील सरपंच प्रदिप दौंडे, आळसुंदे येथील उपसरपंच जोतीराम घाडगे, विनोद पाटील, अभिषेक माने, बाळराजे फरतडे, उपस्थित होते.

पुर्व भागातील आठ ते दहा गावांचा हा गंभीर प्रश्न असल्याने युवासेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्यांनी रस्ता अडवून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करुन आंदोलनकर्ते व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून तोडगा काढला.

या वेळेस जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनात फिसरे ते हिवरे इतर जिल्हा मार्ग क्रमांक ८ वर असलेल्या साखळी क्रमांक २/२०० या हिसरे येथील पुलासाठी २५ लाख, २/७५० या पुलासाठी २० लाख तर ५/४०० साखळी क्रमांक असलेल्या हिवरे येथील पुलाची दुरुस्ती व उंची वाढवण्यासाठी २५ लाख रु निधी प्रस्तावित केला असून अतिवृष्टीत नुकसान झाल्याने तात्काळ निधी उपलब्ध करून घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कोळगाव गौंडरे पुलावरील भगदाड पडले बाबत परांडा पाटबंधारे विभागास नोटीस बजावली आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आज १५ लाख रु निधी प्रस्तावित केला आहे. निधी उपलब्ध होताच डांबरीकरणाने खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिले असून तोपर्यंत आजपासून तात्पुरत्या स्वरूपात मुरुमाने खड्डे बुजवून देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, गुप्तचर विभाग पोलीस निरीक्षक बिभिषण जाधव, पोलीस हवलदार अलदर प्रदिप जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close