
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


किरण शिंदे दूध उत्पादक संस्थेतर्फे दिवाळीनिमित्त संस्थेचे चेअरमन डॉ. किरण शिंदे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते साखर वाटप केली.
भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा समजला जाणारा सण म्हणजे दिवाळी हा आहे. अनेक लोकांना हा सण आपल्या वैयक्तिक किंवा आर्थिक अडचणीने आनंदात साजरा करता येत नाही. त्यातच पावसाने सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा अडचणीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून उदात्त हेतूने किरण शिंदे यांनी जी मदत केली ती कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी यावेळी बोलताना काढले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय चौधरी, विकास सोसायटीचे चेअरमन पोपट शेळके, झरे गावचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, अशोक जाधव, भारत चौधरी, दत्ता सुरवसे, विशाल साळुंखे, शरद कोकीळ, बळीराम चौधरी, प्रवीण शेळके, अजित शिंदे, अक्षय शेळके, योगेश शिंदे, तुळशीराम शेळके, अमोल जाधव, रवी जाधव, हरिभाऊ नलवडे, विठ्ठल शिंदे, अनिल शिंदे, धनंजय शिंदे, बाळू शिंदे, प्रज्वल जगदाळे, सुभाष आवटे, इंद्रजीत शिंदे, सुनील शेळके, मधुकर शेळके, संतोष चौधरी, शहाजी जाधव, आजिनाथ शेळके, जांबुवंत शेळके, रघुनाथ माने, महेश सुरवसे, निलेश माने, नामदेव शेळके, पोपट शिंदे, किसन माने आदी शेतकरी व दूध उत्पादक उपस्थित होते.



