ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये डॉ. आशुतोष कापले यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा शहरात सुरू असलेल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये करमाळा येथील युवा डॉ. आशितोष कापले यांचे विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. सदर व्याख्यानात डॉ. आशितोष कापले यांनी विद्यार्थ्यांना स्व:अनुभव सांगून ध्येयासाठी प्रेरित केले. तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे लक्षात ठेवून यश प्राप्ती नंतर समाजसेवकाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
कठीण काळातच खरा इतिहास निर्माण होत असतो. कोणीही आर्थिक, सामाजिक परिस्थितीचा बहाणा न करता खूप अभ्यास यश मिळवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. आशितोष कापले हे महात्मा गांधी हायस्कुल, करमाळा येथील प्राचार्य कापले सर यांचे सुपुत्र आहेत. प्रास्ताविकात इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. महेश निकत यांनी व्याख्याते डॉ. कपले याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले व त्याचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
व्याख्याना नंतर विद्यार्थी ओंकार गोडगे व रेयना तांबोळी या विध्यार्थ्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या व्याख्यानासाठी इयत्ता बारावीचे विद्यार्थी, क्रॅश कोर्सचे विद्यार्थी तसेच विकास घनवट, अमरजित नलवडे आणि इन्स्टिट्यूटचे प्रा. विशाल वाघमोडे, प्रा. गणेश दहीटनकर, प्रा. अक्षय शिंदे, प्रा. नंदकिशोर वलटे, कोटाच्या प्रा. रजनी मॅडम उपस्थित होत्या.




