
करमाळा/प्रतिनिधी


श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम ता. करमाळा येथे श्री उत्तरेश्वर विद्यालयातील ग्रंथपाल श्री. भाकरे टी. एन यांनी ग्रंथदान देऊन तसेच वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री. उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. कदम एस. बी सर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिन याचे औचित्य साधून उत्तरेश्वर हायस्कूल मधील ग्रंथपाल श्री. भाकरे टी. एन सरांनी समाज सुधारक व संत साहित्य वरील पुस्तके स्वखर्चाने प्रशालेतील ग्रंथालयाला दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर यांनी दिलेल्या पुस्तकांचा स्वीकार केला. तसेच श्री. भाकरे टी. एन सर शालेय ग्रंथालय सुव्यवस्थेत ठेवतात असे प्रतिपादन केले. तसेच १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन प्रशालेत साजरा करण्यात आला. हात कसे धुवावे याचे मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वाघमारे के. एन सर यांनी केले.
यावेळी श्री. कोंडलकर सर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी सर, पर्यवेक्षक श्री. सांगवे बी.व्ही सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



