-->
करमाळासामाजिक

स्व.कै. विनायक फाळके यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

पोमलवाडी (ता.करमाळा) येथिल स्व.कै. विनायक दगडू फाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. छगन खडके महाराज (प्रति इंदोरीकर) यांचे फुलाचे किर्तन संपन्न झाले. तसेच पोमलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस स्व.कै. विनायक फाळके यांचे पुण्य स्मरणार्थ व्यासपीठ (Dias) सप्रेम भेट देण्यात आले. याप्रसंगी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास स्वयंस्फुर्तीने लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी ६० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरास श्री. भगवंत ब्लड बँक सेंटर बार्शीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, विजय तोडकरी, सुयोग निकम, राधिका बेले, प्रणाली घोंगाणे यांनी रक्तसंकलन केले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात डी. सी. सी. बँक मॅनेजर श्री. राजेंद्र रणशिंग साहेब, माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुर्यकांत पाटील, केत्तूरचे माजी सरपंच ॲॅड. अजित विघ्ने, सुहास एकाड, संग्राम पाटील, दत्ता काळे, संभाजी भोपते, श्री. पोपट फाळके, श्री. दत्ता काटे व गौळवाडी, पोमलवाडी, खातगाव व परिसरातील ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी श्री. परशुराम विनायक फाळके, राजेंद्र विनायक फाळके, नवनाथ विनायक फाळके व समस्त फाळके परिवाराचे वतीने कोवीड मधे विशेष कार्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, पोलिस मित्र, आशा वर्कर यांचा ही सन्मान करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close