-->
करमाळाराजकिय

मनसेचे नानासाहेब मोरे यांनी केले भूमि अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराबाबत ‘हे’ आरोप

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा शहर अध्यक्ष मा. नानासाहेब मोरे यांनी करमाळा भुमिअभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करत सदर प्रकार थांबवावा. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा मा. तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, करमाळा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नविन मोजणी, वारस, नकाशा, उतारे करीता येणारे लोकांची अडवणूक व लुटमार केली जात आहे. या कार्यालयातील कर्मचारी कधीच टेबलावर बसलेले दिसत नाहीत. कोण आले की, १०-१० मिनटाला चहा पिण्यास जाण्याच्या बहाण्याने बाहेर हॉटेलमध्ये तास तास बसतात. दिवसातून २ ते ३ तास सुध्दा कर्मचारी टेबलावर बसत नाहीत. त्यामुळे नागरीकांना ताटकळत थांबावे लागते. कोणीच कोणाचे ऐकत नाही. जो-तो कर्मचारी अधिकारी झाल्याने नागरीकांची कुंचबना होत आहे.

 

उदा. एकद्या ग्रामस्थाचे मोजणी करावयाची असल्यास त्यास प्रथम चलन तयार करुन बँकेमध्ये भरण्यास सांगतात व चिरीमिरी घेतल्याशिवाय चलन बँकेमध्ये भरण्यास देत नाही. याबाबत संबंधीत अधिकारी यांना सांगितल्यास ते स्वत:ही म्हणतात की, काय असेल ते चहापाणी देवून टाका. हे मुख्य अधिकारी हयानीच अवघड अथवा किचकट मोजणी करीता बेकायदेशीर पैसे स्विकारण्यास घेण्यासाठी आम्ही सांगतो. त्या हॉटेलमध्ये पैसे ठेवा अशा प्रकारे मागणी करतात.

 

मोजणीमध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणी याबाबत दर ठरलेले असतानाही मन मानेल तसे पैसे घेऊन त्यांच्या सोयीनुसार मोजणी करतात. आमच्या ऑफीसमध्ये मशिन नाही मशिन बाहेर गावावरुन मागवावी लागेल त्याचे पैसे वेगळे द्यावे लागतील असे अधिकारी सांगतात. ज्यानी मोजणी रितसर अर्ज केले आहेत. त्यांची मोजणी वेळेमध्ये होत नाही.

 

महाराष्ट्रातील पहिले कार्यालय आहे जे फक्त दलालासाठी उघडे असते. एक महिला चार कर्मचारी दलालांचे काम करतात. दलालाच्या सोयीनुसार काम करुन पाहिजे तेवढे पैसे दलाला कडून उकळतात. या विभागामध्ये कोणतेच काम नियमात केले जात नाही. काही कर्मचारी करमाळा येथील रहिवाशी असलेने ते कर्मचारी येणाऱ्या ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरतात. करमाळा तालुक्यातील नागरीक त्यांच्या मनमानी कारभाराला वैतागले असून नागरीकांना होणारा त्रास त्वरीत बंद करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. असा इशारा मनसेच्या वतीने नानासाहेब मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

माहितीसाठी या निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर, मा. जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय सोलापूर, मा. संजयमामा शिंदे, आमदार, करमाळा तालुका यांना देण्यात आल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close