
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


जिनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, जेऊर येथील २५ विद्यार्थ्यांनी समर नॅशनल स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. श्री. गणेश करे-पाटील हे होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलतांना राऊत साहेब म्हणाले की, मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी गणित विषया बरोबर मुलांना पुस्तक वाचनाची आवड असणे गरजेचे आहे. पुस्तकांना आपले मित्र बनवून त्यातून नवनवीन गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत व स्वतःचे वेगळे असे व्यक्तिमत्व बनवले पाहिजे. मुलांना सृजनशील बनवणे काळाची गरज आहे. असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी श्रीराज झांजुर्णे, दर्श रणदिवे, आरोही पाटील, अनन्या पाटील, ईशान फकीर, अनुज निर्मळ, आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केले. तर सई नलवडे, स्वरा निर्मळ, पलक बलडोटा, आराध्या वेदपाठक, राजवीर बाबर, वेदांती निमगिरे, ईश्वरी काशीद, शरण्या साळुंके, शाश्वत पाथ्रुडकर या छोट्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालकांमधून सौ. स्वाती बाबर व श्री. वैभव पाथ्रुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर श्री. चंद्रशेखर शिलवंत, अशपाक जमादार, सौ. सुनीता देवी (संचालिका, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, करमाळा), सौ. सोनाली शिंदे (संचालिका, लिटिल स्टार अबॅकस अकॅडमी, बार्शी), मा. सभापती सौ. सुनीता निमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र तसेच यशकल्याणी संस्थेकडून सन्मानपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. करे पाटील सरांनी अबॅकस साठी लागणारी सर्वतोपरी मदत यशकल्याणी संस्था देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. जिनियस प्रोॲक्टिव अबॅकस सेंटर च्या संचालिका कु. अंकिता वेदपाठक यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानून त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंकिता वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विष्णु वेदपाठक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यशकल्याणी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



