-->
करमाळाराजकिय

दोन अपक्ष उमेदवारांचा आ. संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा

 

 प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

२४४ करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मराठा सेवा संघाचे तालुका माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सुजितकुमार काशिनाथ शिंदे यांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन मराठा मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच सुहास शिवमुर्ती ओहोळ यांनीही आपला अर्ज माघारी घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला.

 

यावेळी बोलताना डॉक्टर सुजितकुमार शिंदे व सुहास ओहोळ म्हणाले की आमदार संजयमामा शिंदे हे विकासप्रिय आमदार आहेत त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश प्रमाण मानून आपण हा निर्णय घेतला असून फक्त पाठिंबा देण्यापुरते आम्ही मर्यादित राहणार नसून आमदार शिंदे यांचा जाहीर प्रचार करून त्यांना निवडून आणण्यासाठीही 24 तास प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी डॉक्टर सुजितकुमार शिंदे, श्री सुहास ओहोळ या उमेदवारांबरोबरच प्रवीण पाटील, सुजित बागल, तात्या पाटील, पै. अनिल पवार, गौतम ढाणे, सतीश पाटील, किसन पिंपरे, सोमा लांडे, बबन चोरमले, भाऊसाहेब शेळके, पै. अमोल गायकवाड, दिलीप बागल, नानासाहेब नलावडे, युवराज गपाट, मनोहर रंदवे, आबासाहेब ननवरे, अभिजीत ननावरे, अमोल चाळक, महेश काळे, विनय ननवरे, आजिनाथ मोरे, दिगंबर झिंजाडे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close