-->
करमाळामनोरंजनविशेष

‘या’ कारणामुळे पार्श्र्वगायक प्रवीण अवचर यांचा करमाळ्यात केला सत्कार

 

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

नवरात्र उत्सवाचे निमीत्त साधुन मांगी गावचे सुपुत्र, पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांनी करमाळा येथील नवसाला पावणारी देवी आई कमला भवानी यांची दोन खूपच दर्जेदार गाणी बनवली आहेत. त्यांनी त्यांचे सुरेल आवाजात ही दोन्ही गाणी गायली आहेत. यासाठी त्यांना त्यांचे सह कलाकारांनी पण खूप उत्कृष्ट साथ दिली. दोन्ही गाणी खूप अभ्यासपूर्ण व सुंदर बनवली आहेत. गाणे एकदा ऐकल की परत परत ऐकावी वाटतात अशी गीत रचना केली आहे. त्यामुळे नवरात्री मध्ये करमाळा सह तालुका वासीयांना खूप वर्षानंतर आई कमला देवीचे गीत ऐकायला भेटत आहेत. आज तालुक्यातील प्रत्येक गावात आई कमलाई चे गीतांचा आवाज घुमत आहे. आजपर्यंत आपण येडाई, तुळजापूरची तुळजा भवानी, मोहटा देवीची हजारो गीते संपुर्ण महाराष्ट्र भर ऐकत होतो. परंतु, करमाळ्याची आई कमला भवानी चे एक ही गीत तयार झाले नव्हते. त्यामुळे पहिलेच दर्जेदार गीत प्रविणकुमार यांनी स्वतः बनवले आणि ते सर्व भक्तांना खुपच आवडले. करमाळा शहरासह तालुक्यातील पुणे, मुंबई सह बाहेर देशात राहणाऱ्या भक्तांनीही या गीताला खूपच दादा दिली आहे.

 

परवाच एका ऑस्ट्रेलिया येथे राहणारे प्रविणकुमार यांचे मित्रांनी विडिओ कॉल वरती दाखवले की, तेथील लोक आई कमलाईचे गीतांचा कसा आनंद घेत आहेत. उत्कृष्ट लेखन, सुरेल आवाज, भारदस्त वेस्टर्न आणि  इंडियन संगीताचा मेळ बसवून करमाळ्याची आई कमला भवानी माते चे महिमा सांगणारे गीत असल्याने लोकांना हे गीत प्रचंड आवडत आहे. प्रविणकुमार यांनी असे दर्जेदार गीत बनवून आई कमला भावनी मातेची महती महाराष्ट्रासह देश, विदेशात पोहोचवली. याबद्दल पार्श्र्वगायक प्रवीणकुमार यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. आर आर मोरे सर यांचे सह पत्रकार श्री. चांदगुडे, शिवसेनेचे नेते श्री. संजय शिंदे, शिवसेने चे श्री. संजय शिलवंत, प्रसिद्ध व्यापारी भाजपचे श्री. महेश परदेशी, पत्रकार नितीन आढाव, करमाळा मार्केट कमिटी चे नूतन सचिव श्री. विठ्ठल क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत ढाळे, राष्ट्रवादी चे युवा नेते शिवराज जगताप व आदी सहकारी उपस्थित होते. यानिमित्त करमाळ्याचे सुपुत्र कडा येथील प्राध्यापक समर्पण कादंबरी चे लेखक महेंद्र पेठकर यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close