-->
करमाळाराजकिय

तालुक्यातील रस्त्यांचा मास्टर प्लॅन करून सर्व प्रश्र्न मार्गी लावणार; चिखलठाण येथे उद्घाटनपर कार्यक्रमात आ.संजय मामा शिंदे यांची माहिती

कारखाने दिडशे दिवस चालतील; साखरेला चांगले दिवस येतील-आमदार संजय मामा शिंदे

 

 

 

जेऊर प्रतिनिधी

जो चांगल्या पद्धतीने काम करतो त्याला नक्कीच यश प्राप्त होते. तालुक्यांतील रस्त्यांचा मास्टर प्लॅन करून, सर्व प्रश्न मार्गी लावणार असून आतापर्यंत रस्त्यासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून जातेगांव टेंभुर्णी रस्ता व डिकसळच्या पुलाचे काम कसल्याही परिस्थितीत मार्च अखेर पर्यंत करणार असून, चिखलठाणचे चंद्रकांत सरडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

चिखलठाण तालुका करमाळाचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच कोवीड योद्धांचा सन्मान सोहळा करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, नगरसेवक अतुल फंड, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, मांगी चे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, युवा नेते उदयराज सरडे, माजी पंचायत समिती सदस्य रोहीदास सातव, मानसिंग खंडागळे, कंदर चे सरपंच भास्कर भांगे, देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, प्रविण शिंदे गुरुजी, गणेश जगताप कंदर, सतिश शेळके, कवीटगांव चे सरपंच शिवाजी सरडे, झरे सरपंच प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे, शंभूराजे बोराडे, संचालक पोपट सरडे, राजेंद्र केदार, सदस्य सोमनाथ कदम, महादेव डोके, महादेव कामटे, डॉ .गोरख गुळवे, योगेश बोराडे, राजेंद्र धांडे, सुहास गलांडे, पांगरे चे उपसरपंच संजय गुटाळ, रमेश बोराडे, सुधीर पोळ, दिपक बागल, तात्या सरडे, अशोक तकीक, चिखलठाण चे उपसरपंच आत्माराम सरडे, ग्रामपंचायत सदस्य भागवत मारकड, श्रीकांत पोळ, रमेश जाडकर, अमोल मराळ, सोपान मारकड, आप्पासाहेब सरडे, दादासाहेब सरडे, दत्तात्रय सावळकर, बबन सरडे, सोमनाथ राऊत, श्रीनाथ गव्हाणे, मनोहर गव्हाणे ग्रामसेवक अनिल घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सरपंच चंद्रकांत सरडे म्हणाले की, आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे सात कोटींची कामे गावात चालू असुन गावात ५५ हायमास्ट दिवे बसविले आहेत. चिखलठाण ते जेऊर रस्ता लवकर व्हावा, नवीन ट्रान्सफार्मर मिळावा, व्यायामशाळा, वाड्यावस्त्यांवर भगीरथ लाईट मिळावी अशा मागण्या करत येथून पुढे आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, संजय गुटाळ, पंचायत समिती सदस्य राहुल सावंत, सुहास गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. कुगांव ते चिखलठाण जेऊर प्र.जि.मा झिरो ते पाच किमी डांबरीकरण करणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत लांडाहिरा ते मारकड वस्ती रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत चिखलठाण नंबर १ व २ पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, चिखलठाण नंबर २ मारुती मंदिर सभामंडप बांधकाम, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ते खडीकरण करणे, दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत हरिजन वस्ती, मातंग वस्ती पेवर ब्लॉक बसवणे, नागरी सुविधा योजना अंतर्गत हायमास्ट दिवे बसविणे आदी विकास कामांचे उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकिशोर वलटे यांनी केले. यावेळी चिखलठाण चे सरपंच चंद्रकांत सरडे यांचा वाढदिवसानिमित्त आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close