-->
करमाळासामाजिक

मांगी तलावाचा भराव झाडा- झुडपांच्या विळख्यात; भेगा पडल्यास भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील मांगी तलावावरील भरावाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. ही झाडे झुडपे लवकर न काढल्यास भविष्यात मांगी तलावाच्या भरावाला मोठ्या भेगा पडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रत्यक्षात तलावाच्या भरवावरील झाडे झुडपेच पावसाळ्यापूर्वीच काढायला हवी होती. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही पाटबंधारे विभागाकडून याची दखल घेतली गेली नाही. पावसाळ्यापूर्वी तलावाच्या भरावाची डागडुजी व स्वच्छता न केल्याने आतील व बाहेरील दोन्ही बाजूंनी तसेच पिचींगमध्येही लिंब, बाभूळ, महानंदा, चिल्लार, निरगुडी, तरवड आदी मोठमोठी झाडे झुडपे वाढली आहेत. झाडांच्या मुळ्या खोलवर गेलेल्या असल्यामुळे तलावाच्या भरवावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत.

सध्या मांगी तलावामध्ये चार ते पाच टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पातून मांगी तलावात पाणी आणण्यासंदर्भात किंवा मांगी तलाव पाण्याने भरून घेण्यासाठी कुकडी प्रकल्पाकडे वर्ग करण्यास पाटबंधारे उपविभाग करमाळा जेवढे उदासीन आहे. तेवढेच उदासीन मांगी तलावाच्या भरावाची निगा राखण्यास व साफसफाई करण्यास असल्याचे दिसत आहे. मांगी तलावाच्या भरावाची योग्य साफसफाई व निगा राखण्यास तरी पाटबंधारे विभागाने तत्परतात दाखवावी अशी चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.

मांगी तलावाच्या भरावावरील झाडे झुडपे काढण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही आमच्या मेकॅनिकल विभागाकडून पोकलेन मशीन मागविल्या होत्या. त्यानुसार आम्हाला दोन मशीन मिळाल्या आहेत. सध्या म्हसेवाडी तलाव व नेरले तलावावर झाडे काढण्याचे काम चालू आहे. चार दिवसाच्या आत दोन मशीन पैकी एक मशीन कुंभेज तलाव व दुसरी मशीन मांगी तलावरील झाडेझुडपे काढण्यासाठी आनणार आहोत.

श्री. संजय अवताडे
उप अभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.१२

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close