-->
करमाळाराजकिय

करमाळा तालुका शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते पदी ॲड. शिरीष लोणकर यांची निवड

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुका शिवसेनेच्या प्रवक्तेपदी करमाळ्यातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. शिरीष लोणकर यांची निवड झाली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. ॲड. लोणकर हे केंद्र शासन नियुक्त नोटरी प्राप्त वकील असून त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ साखर कारखाना, मकाई साखर कारखाना, कमलादेवी औद्योगिक वसाहत आदी महत्त्वाच्या संस्थेवर कायदे सल्लागार म्हणून काम केले आहे.

 

करमाळा बार असोसिएशन चे ते माजी अध्यक्ष असून करमाळा तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य आहेत. तर त्यांच्या पत्नी करमाळ्याच्या माजी नगरसेविका आहेत. ॲड. शिरीष लोणकर यांचा करमाळा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचा विश्वास उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख संजय शिलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, गायकवाड, युवा नेते देवानंद बागल, शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

 

या निवडीनंतर बोलताना ॲड. लोणकर म्हणाले की, करमाळा शहर व तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न रखडलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विशेषता येणाऱ्या काळात करमाळा नगरपालिकेच्या दृष्टीने वीस वार्डात स्वबळावर २० शिवसेनेचे उमेदवार उभा करण्याची तयारी आम्ही करीत असून इच्छुकांनी माझ्याशी व शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान ॲड. शिरीष लोणकर यांनी केले आहे.

 

करमाळा शहरातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी युवा सेना, महिला आघाडी, प्रभाग प्रमुख आदी पदावर पदाधिकारी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ॲड. लोणकर यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close