-->
करमाळाकृषी विषयक

बफर स्टॉक मधून युरियाचे वाटप सुरू; लाभ घेण्याचे कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

खरीप हंगामातील पिकाची खुरपणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपलब्ध असलेल्या बफर स्टॉक मधील युरियाची वाटप सुरू झाले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दोन पोते युरिया देण्यात येणार असून प्रति गोणी २६६/- रुपये प्रमाणे आधार कार्ड देऊन नियमाप्रमाणे युरिया घेऊन जावा. असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

 

करमाळा तालुक्यातील ‘या’ दुकानातून युरियाची वाटप सुरु

महेश ऍग्रो एजन्सी करमाळा: विजय ॲग्रो एजन्सी करमाळा ;बालाजी कृषी केंद्र करमाळा ;माऊली कृषी केंद्र करमाळा; या चार बफर स्टॉक युरियाचे दुकानामधून वाटप सुरू झाले आहे. तसेच सद्गुरु कृषी केंद्र कंदर; व पांडुरंग ॲग्रोटेक कुंभेज; याठिकाणी युरियाचे वाटप सुरू आहे.

 

या योजनेचा शुभारंभ महेश ऍग्रो एजन्सी करमाळा येथे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, उपविभागीय अधिकारी अनिल कांबळे, कृषी पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी बोलताना बाळासाहेब शिंदे म्हणाले की, युरिया चा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. विशेषता उडीद, कांदा, तूर सारख्या पिकाला वापर करू नये. शक्य असेल त्यांनी नॅनो युरियाचा वापर करावा, ठराविक कंपन्यांच्या युरियाचा आग्रह धरु नये. विनाकारण लागत नसताना युरियाची खरेदी करू नये बफर स्टॉक हा केवळ बाजारातील टंचाई दूर करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा.

 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या दर्जाची खते उपलब्ध करून देणे हे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे काम असून कृषी विक्रेत्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. शेतकऱ्याची कुठेही अडवणूक होणार नाही पिळवणूक होणार नाही याचीही दखल घ्यावी असे आवाहन केले.

 

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून केळी, ऊस, फळबागा पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर खते लागतात. उपलब्ध असलेली खते व मागणी यामध्ये तुटवडा असून याची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. सध्या कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नाने करमाळा तालुक्याला अधिकचे खत मिळत असून मात्र ते पुरत नाही. शिवाय दुसऱ्या बाजूने रासायनिक खत कंपन्या विक्रेत्यांना इतर खते विक्रीसाठी देत असून यातून लिंकिंगच्या तक्रारी होत आहेत. शेतकऱ्यांनीही सर्व पोषक अन्नद्रव्य असलेल्या खताची मागणी करणे गरजेचे असून ठराविक कंपन्यांचा ब्रँडचा आग्रह धरणे यामुळे प्रश्न निर्माण होत आहेत.

बफर स्टॉक मधील युरियाचे वाटप करताना प्रत्येक कृषी निविष्ठा केंद्रात कृषी सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली असून कोणाला युरिया मिळण्यात अडचण होत असेल तर त्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधावा.

संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close