-->
करमाळा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम संपन्न

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौंडरे (ता.करमाळा) येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयात सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच देशभक्तीपर गाण्यावर नृत्य, लेझीम पथक व लावणी सादर करून हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम राबवून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 

यावेळी गौंडरे व पंचक्रोशीतील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी, पालक, तरुण तसेच माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांचे स्वागत व आभार प्रशालेचे सह शिक्षक गोफणे सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close