कमलाभवानी कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांची सावडी गावास भेट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी साधला संवाद
प्रतिनिधी/संजय साखरे


पांडे ता. करमाळा येथील कमलाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माढा पंचायत समितीचे सभापती श्री. विक्रमसिंह शिंदे यांनी आज गुरुवार दिनांक ९ जून रोजी सावडी ता. करमाळा या गावाचा दौरा केला. सावडी येथील युवक कार्यकर्ते दत्ता शिंदे यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी सावडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
सावडी येथील ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपला ऊस कमलाभवानी साखर कारखान्यास पुढील गाळप हंगामात गाळपास न्यावा अशी विनंती केली. यानुसार चांगल्या प्रतीचा ऊस आपण गाळपास नेऊ असे त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांनी या पुढील काळात अधिक साखर उत्पादन देणाऱ्या ऊसाच्या जातीची लागवड करावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी समाधान भोगे, दत्ता शिंदे, प्रशांत खराडे, शिवलाल शिंदे, नंदू क्षीरसागर, सतीश शिंदे, संभाजी शिंदे, विठ्ठल मचाले, वसंत मचाले आदि मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.



