करमाळा
पत्रकार हरिश्चंद्र साळुंखे यांना मातृशोक; हृदयविकाराच्या झटक्याने निधन
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील सातोली येथील पत्रकार हरिश्चंद्र साळुंखे यांच्या मातोश्री कै. कमलबाई बबनराव सांळुखे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७७ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, चार मुली व नातवंडे असा परिवार आहे.
करमाळा पंचायत समिती चे माजी उपसभापती श्री. बबनराव सांळुखे यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच पत्रकार हरिशचंद्र सांळुखे यांच्या त्या मातोश्री होत्या. यावेळी करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



