प्रतिनिधी/संजय साखरे


राजुरी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १७० विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्यामार्फत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना हा तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल साखरे, आर. आर बापू साखरे, मुख्याध्यापक संतोष शितोळे यांच्यासह सर्व शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



