-->
करमाळाराजकियसामाजिक

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका आढावा बैठक भाजपा संपर्क कार्यालयात संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका पदाधिकारी व शक्ति केंद्रप्रमुख यांची बैठक भाजपा संपर्क कार्यालय येथे पार पडली. या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. धनश्रीताई खटके पाटील उपस्थित होत्या. बैठकीच्या सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकेमध्ये त्यांनी सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख यांना २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा मन की बात कार्यक्रम हा सर्व शक्ती केंद्रावर व शक्य त्या बुथवर घ्यावा. तसेच ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम घ्यावेत असे सांगितले. तसेच बैठकीमध्ये मायक्रो डोनेशन संदर्भात ही सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. पुढे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. धनश्रीताई खटके यांनी तालुक्यातील शक्तीकेंद्र व बुथ प्रमुख यांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ज्येष्ठ नेते विठ्ठलरावजी भणगे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार बाळासाहेब कुंभार यांनी मानले.

 

यावेळी भगवानगिरी गोसावी,
भटके-विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माने मॅडम, करमाळा शहराध्यक्षा संगीता नष्टे, राजश्री खाडे, वनिता साळुंके, चंपावती कांबळे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे,
श्याम सिंधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, दत्तात्रय पोटे, दादासाहेब पाठक, अशोक ढेरे, अनुसूचित जाती जमातीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ भगत, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब होसिंग,
मागासवर्गीय युवक आघाडीचे हनुमंत रणदिवे, शिवाजी ढावरे, भारत चौधरी, किरण शिंदे, प्रकाश ननवरे, किरण बागल, तालुका चिटणीस किरण वाळुंजकर, अजिनाथ सुरवसे, जयंत काळे पाटील, दशरथ चव्हाण, समाधान कांबळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश फंड, गणेश माने, कमलेश दळवी, तेजस बोकन, सुनील जाधव, वशिम सय्यद, मनोज मुसळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close