प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


जातेगाव- टेंभुर्णी दरम्यानच्या राज्य मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. दररोज या रस्त्यावर अपघात होऊन अनेक व्यक्तींचा मृत्यू होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवावे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करमाळा येथील कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा करमाळा तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. के.एम उबाळे यांना दिले आहे.
यावेळी श्री. के.एम उबाळे यांनी आम्ही लवकरात लवकर या रस्त्यावरील खडे बुजवू असे आश्वासन दिले.




