संतापजनक घटना! स्कूल बस चालकानेच केला अल्पवयीन विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार

माय मराठी न्यूज नेटवर्क


स्कूल बस चालकानेच दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १५ वर्षांची ही पिडीत विद्यार्थिनी पुण्यातील कोंढवा परिसरात राहते. तीला स्कूलबसमधून शाळेत नेतांना एका पडक्या इमारतीत नेत आरोपीने बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर घुले पाटील (वय ३५, रा. उंड्री, पुणे) असे आरोपी बस चालकाचे नाव आहे. पोसिलांनी त्याला अटक केली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पिडित १५ वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. घटना १६/७/२०२२ आणि मार्च, जून २०२२ दरम्यान घडली. पिडित मुलगी ही पुण्यातील एका मोठ्या शाळेत दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. ती स्कूल बसने शाळेत ये-जा करत असल्याने तिची स्कूल बसचालक सोमेश्वर घुले पाटील याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपीने तिच्याशी जवळीक निर्माण केली. तसेच ती अल्पवयीन आहे हे माहिती असताना तिला रिलेशनशीपमध्ये राहणार का? अशी विचारणा केली.
पोलीसांनी सदर आरोपीवर बलात्कार व पोक्सो ॲक्ट ३,४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे.
पिडित अल्पवयीन मुलीस रिलेशनशीप म्हणजे काय हे माहिती नसताना देखील त्यास होकार देवून तक्रारदार यांच्याशी बस चालकाने जबरदस्तीने वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले. याबाबतची माहिती मुलीच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी यासंर्दभात मुलीकडे सखोल विचारणा केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पालकांनी मुलीला घेऊन कोंढवा पोलीस ठाणे गाठत दोषी स्कूल बसचालक विरोधात तक्रार दाखल केली.©maharashtra today




