ॲड. विकास जरांडे यांचा केत्तुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी/संजय साखरे


करमाळा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. विकास अण्णासाहेब जरांडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल केत्तुर ग्रामस्थांच्या वतीने आज दि.२६ जून रोजी त्यांचा केत्तूर ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच विलास कोकणे, माजी सरपंच देवराव नवले, माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील, माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, मकाईचे कार्यकारी संचालक हरीभाऊ खाटमोडे, दादासाहेब निकम, शिवाजी पाठक, ॲड. संतोष निकम, सचिन जरांडे, सचिन खराडे, प्रशांत नवले, निवास चव्हाण, शिवाजी पाठक, संतोष राऊत, रावसाहेब चव्हाण, आजिनाथ कनीचे, जयवंत कानतोडे, राहुल भरणे, सागर नरोटे, दत्तात्रेय कनीचे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हरिभाऊ खाटमोडे, अजित विघ्ने, देवराव नवले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती ॲड. विकास जरांडे यांनीही सत्काराला देत आपले मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत पाटील यांनी आभार मानले.




