प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढून पत्नीसह करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर जगदंबा ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी बोलताना महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार येण्याची आशा व्यक्त केली.
यावेळी त्यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील विविध प्रभागामधील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि शहरातील अडी अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकी बद्दल चर्चा केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शाम सिंधी, तालुका उपाध्यक्ष रामा ढाणे, मोहन शिंदे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया, सहकार आघाडीचे सचिन चव्हाण, संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकुर, काका सरडे, बाळासाहेब कुंभार, प्रकाश क्षिरसागर, अमोल पवार, संजय जमदाडे, विशाल परदेशी, जितेश कांबळे सर, विनोद महानवर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



