-->
करमाळाराजकियराज्य

स्वबळावर शिवसेनेचा भगवा फडकवू दे; शिवसैनिक, युवासैनिकांचे कमलाभवानी मातेस साकडे

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

महाराष्ट्राच्या विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकवून शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे. यासाठी करमाळा तालुक्यातील शिवसैनिक व युवासैनिक यांनी करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेस महाआरती करुन साकडे घातले.

 

  • शिवसेना वर्धापनदिनानिमित्त व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका युवासेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखालील भगवा सप्ताह कार्यक्रम सुरु असुन आज वर्धापनदिनानिमित्त युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या हस्ते कमलाभवानी मातेस महाआरती करण्यात आली. तसेच कमलाभवानी मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

 

यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे, तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारीया, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, केम शहर महिला आघाडी प्रमुख आशाताई मोरे, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, प्रमोद वागज, बंडु शिंदे, भिवाजी शेजाळ, गौंडरेचे माजी उपसरपंच शाखा प्रमुख उत्तम हनपुडे, माजी उपसरपंच, आळसुंदेचे माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, राहुल कानगुडे, भाऊ मस्तुद, दिगंबर काटुळे, बाळासाहेब शिंदे, बिरू ठोंबरे अभिमन्यु लोकरे उपस्थित होते.

 

महिला आघाडीने भरली कमलाभवानीची खणानारळाने ओटी

आई कमलाभवानीची खणा- नारळाने ओटी महिला आघाडीच्या वर्षाताई चव्हाण, आशाताई मोरे, प्रियांकाताई गायकवाड यांच्या हस्ते यावेळी भरण्यात आली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close