प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


महाराष्ट्राचे आरोग्य दूत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्त खांबेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे करमाळा तालुका अध्यक्ष श्री. सुशील नरुटे यांच्यातर्फे खांबेवाडी (ता.करमाळा) येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्येची देवता श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, खांबेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील नरुटे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, युवा नेते राहुल चोरमले, सुधीर वायकुळे, सुदाम नरूटे, सुधीर नरूटे, सुरेश हळनवर, अशोक लांडगे, सुशील देवकाते, बिरू वायकुळे, गजेंद्र नरूटे, पप्पू कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, गायकवाड मॅडम, देवकते मॅडम, मोटे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अण्णा सुपनवर म्हणाले की, करमाळा तालुक्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना मदतीचा आधार मिळत आहे. शेकडो रुग्णवाहिका व अनेक रुग्णांना करोडो रुपयांची आर्थिक मदत, निधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी मिळवून दिली आहे. मंगेश चिवटे हे करमाळा तालुक्याचे रहिवासी असून प्रत्येक करमाळाकरांना अभिमान वाटावा असे त्यांचे काम आहे.




