
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील दिलमेश्वर गावचे सुपुत्र युवा गिर्यारोहक स्वप्नील दिलिप मोरे तसेच पुणे जिल्ह्यातील सुधीर मोकाशी (मावळ) श्रीकृष्ण मरगळे (पुरंदर) योगेश करे (इंदापूर) या गिर्यारोहकांनी वेस्ट सिक्कीमच्या माउंट बी.सी रॉय या १८००० हजार फूट उंचीच्या शिखरावर तिरंगा फडकवला आहे. यांनी या अगोदर ही नॉर्थ सिक्कम मधील माउंट ALD या १७१७९ फूट उंच शिखरावर ही तिरंगा फडकवला होता.
हिमालया माउंटरिंग इन्स्टिट्यूट ऑफ वेस्ट बंगाल (HMI) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या १९४ व्या ॲडव्हान्स माउंटरिंग कोर्समध्ये त्यांनी ही कामगिरी केली. स्वप्नील मोरे हे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत तसेच ते एनसीसीचे ही माजी विद्यार्थी राहिले आहेत. या कोर्सचा कालावधी ०१ एप्रिल ते २८ एप्रिल होता. या कोर्समध्ये महाराष्ट्रासह, राजस्थान, दिल्ली, बिहार, कर्नाटक, आसाम, मध्यप्रदेश या राज्यातून एकूण ५८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. एकूण २८ दिवसांच्या खडतर प्रशिक्षणात स्वप्निल, सुधीर, योगेश, कृष्णा यांनी सिक्कीममधील माउंट बी. सी. रॉय या १८००० हजार फूट उंचीच्या शिखरावर तिरंगा फडकला. सतत होणारी हिमवृष्टी, पाऊस, बदलते हवामान, ऑक्सिजनची कमतरता या सर्वांवर मात करून त्यांनी हे यश मिळवले.
गिर्यारोहणातील प्रशिक्षणात स्वप्नील मोरे, सुधीर, कृष्णा, योगेश यांनी अनेक तंत्रे व आपत्कालीन स्थितीतील बचावात्मक तंत्रे यांचे प्रशिक्षण घेतले. हिमालया माऊंटरिंग इन्स्टिट्यूटमध्ये सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये गंबु रॉक वरती झुमरींग, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग, आर्टिफिशल एट क्लाइंबिंग इत्यादीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. या प्रशिक्षणामध्ये त्यांना HMI चे प्रिन्सिपल जय किसान सर, कोर्स सीनियर ज्योती सर, रोप सिनियर पॉवेल शर्मा सर, तेणझिंग सर, आदित्य सर, अभिषेक सर, दावा सर, रमेश सर आदींचे मार्गदर्शन लाभले.
स्वप्नील मोरे हे करमाळा तालुक्यातील एकमेव युवा गिर्यारोहक आहेत त्यांनी आपल्या गावासह करमाळा तालुक्याचे ही नावलौकिक केले आहे.
प्रशिक्षणामध्ये आमचा HMI ते टायगर हिल असा २४ कि. मी. ट्रेकचा सराव करून घेतला. त्यानंतर आमचा बर्फा मधील ट्रेनिंगसाठी प्रवास सुरू झाला. युकसूम ते HMI बेस कॅम्प पर्यंतचा ट्रेक ३९ कि.मी. होता. ७ तारखेला सुरू झालेला ट्रेक ११ तारखेपर्यंत आम्ही बेस कॅम्पला पोचलो. बेस कॅम्प ते अडव्हान्स कॅम्प तीन दिवस लोड फेरी केली. प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य तसेच राहण्याचे, जेवणाचे व स्वतःचे सामान सोबत घेऊन गेलो.
ॲडव्हान्स कॅम्प मध्ये हार्ड आईस मध्ये ट्रेनिंग घेतली. यामध्ये क्लाइंबिंग, रेडर क्लाइंबिंग, झूमरिंग, रूट ओपनिंग, रोपे फिक्सिंग, फिक्स रोप क्लाइंबिंग, सोलो क्लाइंबिंग, ग्रुप क्लाइंबिंग, रॅपलिंग, क्रेवस क्रॉसिंग, इत्यादीचे आम्ही प्रशिक्षण घेतले.
स्वप्निल मोरे,
गिर्यारोहक, करमाळा.




