-->
करमाळाराजकियसामाजिक

अहिल्यादेवी गार्डन करिता आ. संजयमामा शिंदे यांचेकडुन निधी उपलब्ध करुन घेणार- अॅड अजित विघ्ने

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील केत्तूर नं-२ या गावी आज मंगळवार दिनांक ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधुन संयोजक राजेंद्र खटके, दिपालीताई डिरे यांनी जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच उदयसिंह पाटील हे होते. याप्रसंगी व्याख्याते यशवंतराव गायकवाड यांचे व्याख्यान झाले. केत्तुर ग्रामपंचायत कार्यालयातही जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी माजी उपसरपंच हरिश्चंद्र खाटमोडे, चिंतामणी कानतोडे, प्रविणशेठ नवले, आदिनाथचे माजी संचालक संतोष पाटील, युवक कॉंग्रेस अध्यक्ष निवासदादा उगले, राजाराम ठोंबरे, पोलिस पाटील गणपतराव पाटील, दादासाहेब कानतोडे- पाटील, माजी उपसरपंच व ज्येष्ठ नेते भिमराव येडे, मच्छींद्र चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी अॅड. अजित विघ्ने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच केत्तुर येथे नियोजीत अहिल्यादेवी गार्डन करिता आमदार संजयमामा शिंदे यांचेकडुन निधी मिळविणार असल्याचे सांगितले. याबाबत आमदार संजयमामा शिंदे यांना पत्रव्यवहार केलेला असुन याकरिता माजी सरपंच अशोकराव पाटील व विद्यमान उपसरपंच प्रशांत नवले देखील प्रयत्नशील असुन लवकरच आमदार संजयमामा शिंदे यांचे कडुन अहिल्यादेवी गार्डन साठी भरघोस निधी प्राप्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close