
केम प्रतिनिधी/संजय जाधव


शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे हे शिवसेना पक्षात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचे आरोप करणा-या बंडखोर शिवसैनिकानी पक्षावर निष्टा असणाऱ्या व पक्षासाठी संपूर्ण आयुष्य घालवणाऱ्या सच्या शिवसैनिक धनंजय डिकोळे यांना पक्ष निष्टा शिकवू नये. असे परखड मत करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम यानी व्यक्त केले. त्या केम येथे मावळा ग्रुपच्या वतीने नुकत्याच करमाळा तालुका समित्या मध्ये निवड झालेले दक्षता कमिटी सदस्यपदी सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम व शांतता कमिटी सदस्यपदी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री. हरी तळेकर यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात सौ. चव्हाण मॅडम बोलत होत्या.
केवळ जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या शिफारशीनुसार निष्टावंत शिवसैनिक सुधाकर लांवड, प्रविण कटारिया, श्रीहरी तळेकर व चव्हाण मॅडम यांना करमाळा तालुका समित्यांमध्ये स्थान मिळाले आहे. बंडखोर शिवसैनिक म्हणतात की, करमाळा तालुक्यात एकाही शिवसेना कार्यकर्त्यांना समित्यावर घेतले नाही. मग आम्ही कोण आहोत असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मावळा ग्रुपचे दत्ता भाउ तळेकर, गणेश आबा तळेकर, विष्णूपंत तळेकर, सचिन जाधव, ज्ञानेश्वर तळेकर, राम तरकसी,अमोल तळेकर, मदन गायकवाड, विक्रम तळेकर, महादेव पळसकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.
या निवडीबद्दल बोलताना चव्हाण मॅडम म्हणाल्या की, मला मिळालेल्या दक्षता कमिटीतून गोर गरिबाना रेशन दुकानदार व्यवस्थित नियमाप्रमाणे माल देतात का.? या मध्ये मला जर रेशन दुकानदार गरिबांचा माल हडप करीत आहेत. असे समजले तर मी त्याची गय करणार नाही, असे त्यांनी सांगितले. रेशनदुकान दररोज ऊघडी राहिली पाहिजेत. काही दुकाने ठराविक वेळेतच ऊघडी असतात. हे माझ्या निदर्शनास आले आहे यावर मी कारवाई करणार आहे.
मी गेली १८ वर्ष झाले शिवसेनेत एक शिवसैनिक म्हणुन काम करीत आहे. मी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेच्या नियमाप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे काम करत आहे. माझ्या कामाची दखल घेऊन शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांनी माझी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी नेमणूक केली. त्या नेमणूकीचे पत्रही माझ्याकडे आहे. मी कधीही पदाचा गैरवापर न करता, पद असो नसो माझे काम सुरूच आहे. पण काहीजण अलिकडील शिवसेनेतून हाकलपट्टी केलेले पेपरबाजी करून शिवसेनेची बदनामी करत आहेत. त्यांनी जिल्हाप्रमुख धनजंय डिकोळे यांच्यावर खोटे आरोप करण्याचा धंदा थांबविले पाहिजेत.
सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम, अध्यक्षा, करमाळा शिवसेना महिला आघाडी



