प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील केम येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मावळा ग्रुप व धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, केम यांच्या संयुक्त विद्यमाने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक गणेश आबा तळेकर, सचिन जाधव, मावळा ग्रुपचे अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ तळेकर व स्वराज्य मर्दानी खेळ प्रमुख अक्षय तळेकर यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये दि. १४ मे रोजी सकाळी ८:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पारंपारीक पद्धतीने पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पावनखिंड चित्रपटात बांदल यांची भूमिका साकारणारे कलाकार गणेश दादासाहेब टावरे (पुणे) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत छत्रपती शंभुराजे यांच्या चरित्रावर व्याख्याते शिवश्री कदम सर यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच सकाळी १०:०० ते सायं. ५:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ मे रोजी सायं. ०५:०० वाजता भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मदन गायकवाड, विष्णूपंत तळेकर, विक्रम तळेकर, ज्ञानेश्वर तळेकर, ओंकार जाधव, विशाल ओहोळ तसेच आदी शिवशंभु भक्त उपस्थित होते. केम व पंचक्रोशीतील शिवशंभु भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




