-->
करमाळाराजकिय

‘ईव्हीएम हटाओ’ मागणीसाठी शिवसेना, युवासेना मोटारसायकल रॅली काढणार- शाहुदादा फरतडे

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

“ईव्हीएम मशीन हटाओ” या मागणीसाठी शिवसेना, युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून बुधवार दि. १३ मार्च रोजी सकाळी ११ वा भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ हे या रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. महात्मा गांधी पुतळ्यापासून या रॅलीस सुरवात होणार असून शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून प्रमुख मार्गावरून ही रॅली तहसिल कार्यालयासमोर जाणार आहे.

 

शिवसेनेच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जगातील १९४ राष्ट्रांपैकी १२० देशांमध्ये मतदान मतपत्रिकेद्वारेच होते. इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, नेदरलँड आदी देशांनी ईव्हीएम पद्धती बंद करून मतदान पत्रिकेचा स्वीकार केलेला आहे. अनेक देशांनी भंगारात काढलेल्या ईव्हीएम मशीन चा भारतात मतदानासाठी वापर होत आहे. या मशीनवर सर्वसामान्य नागरीकांचा विश्वास नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वर मतदान प्रकिया राबवावी. हि मागणी करण्यासाठी या मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले असुन “ईव्हीएम हटाओ, देश बचाओ” या मागणीस पाठींबा देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

 

या प्रसिद्धी पत्रकावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, तालुका संघटक प्रवीण कटारीया, शहरप्रमुख संजय शिंदे, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवती सेना तालुकाप्रमुख सौ.वैष्णवी साखरे, प्रमोद वागज, अ‍ॅड. विकास जरांडे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, पंकज परदेशी, संजय भालेराव,  युवासेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, शहरप्रमुख समीर हलवाई, उपतालुकाप्रमुख अभिषेक मोरे, समाधान यादव, रामेश्वर पांढरमिसे, पांडुरंग ढाणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुका समन्वयक कुमार माने, अजयराजे साखरे, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, आदींच्या सह्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close