पायल जाधव हिची वूमेन्स ॲथलेट कमिशन पदी नियुक्ती
लोणंद /प्रतिनिधी


लोणंद ता. खंडाळा येथील पायल इंद्रजीत जाधव या विद्यार्थिनीची वूमेन्स ॲथलेट कमिशन पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती युथ गेम्स कौन्सिल इंडिया यांच्या वतींने करण्यात आलेली असून याबाबतचे पत्र या कौन्सिलचे डायरेक्टर व सेक्रेटरी जनरल अमरसिंग चंदेल यांनी दिलेले आहे. या नियुक्ती बद्दल पायल जाधव हिचे क्रीडा क्षेत्रातून तसेच लोणंद पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
पायल जाधव ही लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत शिकणारी विद्यार्थीनी आहे. गेली अनेक महिन्यापासून पायल जाधव तिच्या तायक्वांदो स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. या खेळातून यश मिळवित असताना पायल ने अनेक वेळा सुवर्णपदकाला गवसणी घातलेली आहे. युथ गेम्स कौन्सिल इंडिया साठी पायलचे भरीव असे योगदान असून या कार्याची दखल घेऊन वूमेन्स ॲथलेट कमिशन पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पायलचे आमच्या या कुटुंबात स्वागत करत असल्याचे अमरसिंग चंदेल यांनी म्हटलेले आहे.
पायल हे सगळं काही घर, नोकरी आणि अकादमी प्रॅक्टीस सांभाळून करत आहे. तिचं हे यश वाखाणण्या जोगे आहे.




