प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


वाशिंबे ता. करमाळा येथील श्री. अमित तानाजी निमकर यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा हा प्रवास करमाळा वासीयांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांना बढती मिळाली असून बांधकाम विभागाने बढतीचे आदेश काढले आहेत.
अमित निमकर हे कर्जत जिल्हा अहमदनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता पदी कार्यरत होते. निमकर हे २०१० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, करमाळा जि. सोलापूर येथे उपअभियंता म्हणून २०१२ ते २०१४ पर्यंत काम केले. नंतर २०१४ ते २०२० पर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा या ठिकाणी काम केले. करमाळा या ठिकाणी काम करताना त्यांनी तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे पोमलवाडी पूल, केतूर पूल तसेच कोर्टी टाकळी रस्ता, बाभूळगाव- जिंती- कुंभेज रस्ता, जेऊर ग्रामीण रुग्णालय, जातेगाव ते टेम्भूर्णी रस्ता दुरुस्ती अशी महत्वाची कामे गुणवत्तापूर्वक करण्यात योगदान दिले.
निमकर यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना २०१९ मध्ये उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर केला. ते सामाजिक कामातही अग्रेसर होते. सध्या ते मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष या पदी काम करत आहेत. त्याच्या कामाची दखल घेऊन कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना कर्जत या ठिकाणी बदली करून घेतले होते. ते कर्जत या ठिकाणी २०२० ते आजपर्यंत कार्यरत होते. त्या ठिकाणीही त्यांनी अल्पावधीत कामाची चुणूक दाखवली. सर्व स्तरातूनकर निमकर साहेबांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रामाणिकपणाचे व तळमळीने काम करण्याचें एक उत्तम उदाहरण म्हणजे अमित निमकर साहेब पुढच्या पिढीसाठी वाशिंबे येथील तरुणांसाठी निमकर साहेबांनी आदर्शमय व्यक्तिमत्व निर्माण केले. करमाळा तालुक्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. वाशिंबे चे निमकर साहेब म्हणून त्यांचा जिल्ह्यात नावलौकिक आहे.
श्री. मनोज बोबडे (जिल्हा संसाधन व्यक्ती, कृषी विभाग, करमाळा)



