-->
करमाळासामाजिक

निमगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त “एक दिवस सैनिकांसाठी” उपक्रम साजरा

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

निमगाव (ह.) ता. करमाळा येथे आज दि. ३० एप्रिल रोजी निमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. दिलीप स्वामी साहेब यांचे संकल्पनेतुन साकारलेल्या व करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त “सैनिक हो तुमच्यासाठी, एक दिवस सैनिकांसाठी” हा उपक्रम निमगाव ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वप्रथम निमगाव गावातील सर्व आजी- माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील उपस्थित सदस्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून ग्रामपंचायतीच्या वतीने माजी ग्रा. सदस्य सिद्धेश्वर नाना जगदाळे व उपसरपंच श्रीकांत निळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर सैनिक नानासाहेब सुभाष रोकडे (मेजर) यांच्या नविन बांधून झालेल्या घराची ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेवुन मालमत्ता रजिस्टरचा उतारा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी सुरेखा नीळ यांचे हस्ते देण्यात आला. तसेच त्यांची राहत्या घराची घरपट्टी शासन निर्णयानुसार अटी व शर्तीच्या अ़धिन राहुन माफ केल्याचे पत्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनोज लटके यांचे हस्ते देवुन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित मेजर रोकडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सिमेवर देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना च्या काही घटना व प्रसंग सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजना बाबत ग्रामपंचायतीचे आभार मानुन समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच श्रीकांत निळ, ग्रा. सदस्या सुरेखा नीळ, समाज सेवक राजेंद्र शिंगण, नारायण जगदाळे, आश्रू शेंडगे, मोहन जगताप, अंकुश भोसले, संगणक चालक हनुमंत जगदाळे, बाबासाहेब जगताप व ईतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम रोजगार सेवक संतोष जगताप यांनी केले. तर आभार नानासाहेब निळसर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close