करमाळा
मोरवड येथील महादेव मोहोळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मोरवड येथील महादेव साहेबराव मोहोळकर यांचे आज मंगळवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वा. ह्रदयविकाराच्या धक्कयाने निधन झाले. मृत्यु समयी ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. मोरवडच्या सरपंच मंगल मोहोळकर यांचे ते दिर होते. ते माजी आमदार नारायण पाटील समर्थक होते. त्यांच्या अकाली जाण्याने मोरवड व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




