-->
करमाळाराजकियविशेष

करमाळा नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १० कोटी निधी मंजुरीचे आदेश- आ.संजयमामा शिंदे

 

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

           

 

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत करमाळा नगर परिषदेसाठी २०२१-२२ या वर्षासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १९ एप्रिल २०२० रोजी च्या शासन अध्यादेशानुसार १० कोटी निधी मंजुर झाल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आपण मार्च २०२२ मध्ये करमाळा नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांना राज्यस्तरीय ठोक निधी तरतुदी अंतर्गत १० कोटी रुपयांची निधीची मागणी केली होती. सदर निधी मंजूर झालेला असून या निधीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकाम करणे यासाठी ४५ लाख, करमाळा महानगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकाम करणे यासाठी ४ कोटी ५५ लाख तसेच करमाळा नगरपालिका क्षेत्रात सांस्कृतिक भवन बांधकाम करणे यासाठी ५ कोटी असा एकूण १० कोटी निधी मंजूर झालेला असून या निधीमधून मार्च २०२३ अखेर ही कामे पूर्ण होतील. त्यामुळे शहराच्या वैभवात निश्चितच भर पडेल असा दावा ही आमदार संजयमामा शिंदे यांनी केला. भविष्यकाळातही शहरांतर्गत रस्ते व बंदिस्त गटारी यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून तसे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close