
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय, रावगाव (ता. करमाळा) येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिणिर्वान दिनानिमित्त शुक्रवार दि. ०६ डिसेंबर रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रथम नागरिक तथा सरपंच संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, ग्रामविस्तार अधिकारी रामदास हजारे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगावचे मुख्याध्यापक बबन पाटूळे, माजी पंचायत समित सदस्य विलास मुळे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार, मुंबई सत्र न्यायालयातील ॲड. राहूल कांबळे, माजी सैनिक शहाजी ओहोळ, कामगार सेल भाजपा प्रणीत ज्ञानेश्वर पवार, गाव कामगार कोतवाल बाजीराव पवार, आदि मान्यवर व ग्रामस्थ वाचकवर्ग उपस्थित होते.
या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील लिखीत ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, याचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमसाठी राहूल पवार व प्रकाश कांबळे यांनी परिश्रम घेतले तर आभार सचिव भास्कर पवार यांनी मानले.




