-->
करमाळासामाजिक

करमाळा येथे नरेंद्रसिंह ठाकूर यांच्या हस्ते आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन

 

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आरती संग्रह या पुस्तिकाचे प्रकाशन संजय गांधी निराधार योजना सदस्य श्री. नरेंद्रसिह ठाकूर यांच्या हस्ते करमाळा येथे
संपन्न झाले. ही पुस्तिका करमाळा शहर तसेच करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वितरित केली जात आहे.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की, गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा वारसा आहे. संघटन व सदाचाराचे दर्शन यामुळे होते. या पुस्तिका मध्ये सर्व आरत्यांचा समावेश आहे. एकमेकांमध्ये बंधुभाव वाढावा हाच गणेश उत्सव समारंभाचा खरा उद्देश आहे.

यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. दीपक चव्हाण, सोलापर जिल्हा सचिव अमोल पवार करमाळा, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close