-->
करमाळाविशेष

हिवरे येथे ‘शाळापूर्व तयारी अभियान मेळावा’ उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

हिवरे ता. करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापुर्व तयारी अभियान अंतर्गत पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच गावातुन शैक्षणिक जागृती बाबत ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली.

 

           या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभुराजे फरतडे, सरपंच सुनिता माळी, उपसरपंच मैना फरतडे, ग्रा. सदस्य उमेश मगर, माजी ग्रा. सदस्य अमोल फरतडे, आकाश ओहळ, किरण मगर, महादेव विटुकडे, चंद्रकांत भोगल आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

 

         उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सुग्रीव निळ यांनी केले. तर आभार सहशिकक्षक निळकंठ हनपुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिकक्षक जालिंदर हराळे, सुरेश शिंदे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, लहु चेंडगे, कुलकर्णी मॅडम व अंकुश माने यांनी परिश्रम घेतले.

 

          या वेळी सहशिकक्षक निळकंठ हनपुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे शंभुराजे फरतडे, उमेश मगर, किरण मगर, आकाश ओहळ यांनी मनोगत व्यक्त केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close