-->
आरोग्यकरमाळाविशेषसामाजिक

पवार हॉस्पिटल व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित संधिवात तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यातील करंजे येथे आज दि. १७ एप्रिल रोजी संधिवात व रक्तदान शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्यानी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. गणेश भाऊ करे पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व थोर महापुरुषांना वंदन करून करण्यात आली. तसेच यावेळी करंजे गावातील MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या अभयसिंह पाटील, ऋतुजा सरडे व संभाजी पवार यांचा सत्कार डॉ. रवीकिरण पवार व मा. गणेश करे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना करे पाटील म्हणाले की, करंजे येथील MPSC मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच यापुढे ही करंजे गावातील प्रत्येक शासकीय पदावराती एक अधिकारी असला पाहिजे. करंजे येथे वाचनालय उपलब्ध करून विद्यार्थ्यांना लागणारी MPSC, UPSC साठी ची पुस्तके उपलब्ध करणार आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांसाठी योग्य ती मदत करणार आहे. असेही गणेश करे-पाटील यांनी सांगितले.

 

या शिबिरात ५४ युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. रक्त संकलनासाठी कुर्डूवाडी येथील कुर्डूवाडी ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. तसेच भविष्यात रक्तदात्यांना व गरजू रुग्णांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत रक्तपिशवी देण्यात येईल असे ट्रस्टचे तालुकाध्यक्ष मा. संजय सरडे यांनी सांगितले. पवार जनरल हॉस्पिटलचे डॉ. रवीकिरण पवार यांनी संधिवात चा त्रास असलेल्या १०४ वयोवृद्ध रुग्णांवर उपचार केले. तसेच करमाळा येथील पवार हॉस्पिटल मध्ये बिल कमी करून रुग्णांना योग्य उपचार करणार असून पवार हॉस्पिटल मध्ये नवीन टेक्नॉलॉजीचे मशीन उपलब्ध असल्याने आता उपचारासाठी बाहेर तालुक्यात जाण्याची गरज नाही असे डॉ. रविकिरण पवार यांनी सांगितले.

 

यावेळी मा. बाबासाहेब पाटील, बलभीम पवार, सुरेश फुके, डॉ. बबन सरडे, गणेश भाऊ सरडे, आण्णासाहेब पाटील, ज्ञानदेव पवार तसेच गावातील युवा वर्ग, ग्रामस्थ व वयोवृद्ध उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करंजे गावातील युवकांनी व पवार हॉस्पिटल येथील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close