जान्हवी सावंत या चिमुकलीचे आमदार संजयमामा शिंदे यांचेकडुन कौतुक
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


काल दि. १४ एप्रिल रोजी करमाळा येथे झालेल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती सोहळ्यामध्ये कु. जान्हवी राहुल सावंत हीने केलेल्या भाषणाचे कौतुक करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. आमदार संपर्क कार्यालयात स्वतः आमदार साहेबांनी आवर्जुन जान्हवीला बोलावुन घेतले आणि तिचे तोंड भरून कौतुक केले.
जान्हवी हिने काल करमाळा येथे हजारोंच्या जनसमुदाया समोर आवेशपुर्ण आणि जोरदार भाषण केले होते. जान्हवीचे भाषण काल दिवसभर व्हायरल झाले आणि लाखो लोकांनी तिचे भाषणाला लाइक्स दिल्या. जान्हवी ही पंचायत समितीचे सदस्य व हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांची कन्या असुन तिचे भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे वेळी ॲड. राहुल सावंत, दादासाहेब सावंत, तानाजी बापु झोळ, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, उद्धवदादा माळी, दत्ता भाऊ जाधव, भोसेचे मा. सरपंच भोजराज सुरवसे, पाडळीचे सरपंच गौतम ढाणे, नेरलेचे सरपंच समाधान दोंड, गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग भैय्या खंडागळे, युवा नेते रवींद्र वळेकर, सुरज ढेरे, ब्रह्मदेव राख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



