
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


कोरेगाव भीमा, ता.शिरूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं.२ ची निवडणूक बिनविरोध पार पडली असून बबूशा आनंदराव ढेरंगे चेअरमन पदी तर व्हॉईस चेअरमन पदी सारिका संभाजी गव्हाणे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
कोरेगाव भीमा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नं.२ ची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली होती यावेळी श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनल ने १३ जागा जिंकत आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले होते. माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पॅनल निवडून आला.
कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, वाडा पुनर्वसन येथील शेतकऱ्यांची विश्वसनीय संस्था असून तीन गावांची असणारी सोसायटीच्या चेअरमनपदी बबुशा ढेरंगे व व्हॉईस चेअरमन पदी सारिका संभाजी गव्हाणे यांची निवड बिनविरोध झाली असून बबुशा ढेरंगे हे पहिल्यांदाच निवडणूक लढले व निवडून आले तसेच पहिल्यादांच त्यांना चेअरमन पदाची संधी मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. व्हॉईस चेअरमनपदी सारिका गव्हाणे यांची निवड झाल्याने शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग. द. पुंड यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, सरपंच अमोल गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे, भाऊसाहेब गव्हाणे, माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, नारायण फडतरे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, मधूकर गव्हाणे, रमेश गव्हाणे , स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे, उद्योजक रामदास ढेरंगे, दत्तात्रय गव्हाणे, संभाजी गव्हाणे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर गव्हाणे, नितीन गव्हाणे, नारायण गव्हाणे, बापूसाहेब गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, तुषार गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, स्वाती सव्वाशे, कविता गव्हाणे, नेहा गव्हाणे, अनिल कुंभार उपस्थित होते.



