
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले अभिवादन मनोगत व्यक्त केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे बोलताना म्हणाले की, क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांनी अतिशय प्रतिकूल काळात व जिथे स्वत:चे विचार लोकांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य नव्हते अशा परिस्थितीत स्त्री शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा पाया घातला. त्यांचे हे थोर सामाजिक कार्य तसेच त्यांचे विचार जोपासले तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करण्याचा उद्देश सफल होईल, असे मत महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, नानासाहेब अनारसे, रासपचे अंगद देवकते, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस भैय्याराज गोसावी, बापू मोहोळकर, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष कमलेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.



