केमप्रतिनिधी/संजय जाधव


उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला करमाळा तालुक्यातील केम येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु, करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर टायर पेटवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आत्तापर्यंत विरोधी पक्षाने पुकारलेल्या कोणत्याही विषयाच्या बंदला केम येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळत होता. परंतु महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यानी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही बंदचे आवाहन केले नाही. कोरोनामुळे अगोदरच दुकानदार, व्यापारी व छोटे मोठे व्यावसायिक यांचे नुकसान झालेले आहे. आता कोठे तरी दुकाने सुरळित चालायला लागली आहेत. तोपर्यंत हा बंद आला त्यामुळे व्यापाऱ्यानी बंद कडे पाठ फिरवली. परंतु, शिवसेना महिला आघाडीच्या करमाळा तालुका अध्यक्षा सौ. वर्षाताई चव्हाण मॅडम यांच्या नेतृत्वाखाली केम येथील महिलांनी रस्त्यावर उतरून टायर पेटवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी शहर प्रमुख आशा मोरे, रोहिणी नागणे, राणी तळेकर, सरस्वती कुंडे, रेश्मा देवकर, अंजलीताई लोंखडे, ऊज्वला कंगळे, गावडे मॅडम, सुशिला जाधव, भोसले मॅडम, पुजा तळेकर आदि महिला सहभागी झाल्या होत्या.



