-->
आरोग्यसामाजिक

अर्चना सुपेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न

 

प्रतिनिधी/गजाननगव्हाणे पाटील

 

        वाढत्या तापमान वाढीला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून नागरिकांनी जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लावून ते जगवले पाहिजेत असे प्रतिपादन कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या अर्चना निखिल सुपेकर यांनी केले.

 

       वढू खुर्द, ता. हवेली येथील टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन या कंपनीमध्ये अर्चना सुपेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ४० विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक दीपक कदम (सर), कर्मचारी योगीराज भंडारे, महेंद्र काळे, तुषार काळे, लखन जाधव, राहुल आव्हाळे, विशाल गुंडकर, प्रदीप हिवरले, सागर वाघमारे, वैभव वरपे, रामेश्वर तोत्रे, कानिफ वाघमारे, प्रमोद पवार, विलास थोरात, कुमार इंगळे, शरद मुळे, अतुल भोंडवे, राहुल पटेकर, नितीन लांडे, अजय कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.

 

        मागील काही दिवसांपासून जागतिक तापमान वाढीचा परिणाम विविध घटकांवर झाला असून बेसुमार वृक्ष तोडीमुळे अनेक पक्षांचे आसरे जमीनदोस्त झाले आहेत. जंगले कमी झाल्याने अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले असून भावी पिढीला चांगले जीवन देण्यासाठी आजच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल सुपेकर यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close