-->
महिलाविषयकराज्यविदेश

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुर्केगाव, ता. हवेली येथील नितीन (आप्पा) बाजारे मित्र परिवाराच्या माध्यमातून राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, आदर्श माता, कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, निवेदिका अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५० महिलांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

 

 

या सन्मान सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुका अध्यक्षा सुरेखा भोरडे, माजी अध्यक्षा लोचन शिवले, माधुरी वाळके, सीमा गावडे, अनामिक शितोळे, कविता रविंद्र बाजारे, प्रतीभा मनोहर यनभर, वैशाली सोनवणे, तसेच हवेली तालुका सरचिटणीस मुक्ता जांभळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

 

 

यावेळी सुरेखा भिकाजी काळे यांची बुर्केगाव राष्ट्रवादी महीला काॅग्रेसच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आभार सुप्रिया बबन ठोंबरे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close