-->
करमाळाराजकिय

जातेगावच्या उपसरपंचपदी शिंदे-जगताप गटाच्या सुमित्रा धुमाळ यांची बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

जातेगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे-जगताप गटाच्या समर्थक सौ. सुमित्रा बाळासाहेब धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच छगन ससाणे व ग्रामसेवक श्री. केवारे भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत दि. ४ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा झाली. त्यावेळी ही निवड करण्यात आली आहे.

 

   या निवडीवेळी काशीनाथ कामटे, यशवंत शिंदे, प्रविण शिंदे, रामकिसन धुमाळ, प्रमोद वारे, महेंद्र करे, अशोक शिंदे, बाबासाहेब शिंदे, अच्चूत कामटे, प्रकाश पाटील, भैरवनाथ निगडे, तुषार शिंदे, अजिनाथ निगडे, अमोल पाटील, दिलीप काकडे, मोहन धूमाळ, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शिंदे, डॉ. आशिष शिंदे, भाऊसाहेब शिंदे, भाऊसाहेब गाढवे, पप्पूदादा पाटील, मंगेश घुमाळ, राजेंद्र पाटील संपत शिंदे, सौ. गौरी वारे, सौ. आश्विनी शिंदे, सौ. वर्षा धुमाळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या निवडीबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे व युवा नेते शंभूराजे जगताप यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close