-->
करमाळासामाजिक

कौतुकास्पद- पारेकर पाटील कुटुंबीयांनी आईची आठवण म्हणून प्रथम पुण्यस्मरण दिनी केले वृक्षारोपण

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यातील मौजे पांगरे येथील पारेकर कुटुंबीयांनी शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या आईची आठवण म्हणून प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वडपिंपळ यांचे वृक्षारोपण केले. तसेच ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर (बिटरगाव) यांचे सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत सुश्राव्य असे किर्तन आयोजित केले होते.

गं.भा. सत्यभामा बाबुराव पारेकर पाटील यांचा चार मुले, सुना, एक मुलगी व नातवंडे असा एकत्रित परिवार आहे. सर्वात मोठा मुलगा रामराव बाबुराव पारेकर पाटील हे पांगरे गावचे माजी सरपंच असून त्यांनी भारतीय सैन्य दलात सेवा केली आहे. दुसरा मुलगा भालचंद्र बाबुराव पारेकर पाटील हे वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय करतात. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा चंद्रकांत बाबुराव पारेकर पाटील हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करत आहेत. तर सर्वात लहान मुलगा दिलीपकुमार बाबुराव पारेकर पाटील हे नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 

या पुण्यस्मरण सोहळ्या प्रसंगी मा. अनिरुद्ध आण्णा कांबळे, (अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद), शिवाजी बंडगर सर, (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा), विलास बापु वाघमोडे (माजी सभापती, पंचायत समिती, इंदापूर व संचालक निरा भीमा सहकारी साखर कारखाना), अजित दादा तळेकर (माजी सरपंच, केम), दशरथ बापू धडस (प्रगतशील बागायतदार), शहाजी देशमुख सर (मा.व्हा. चेअरमन आदिनाथ स.सा.का.आदिनाथनगर), अंबादास पाटील (माजी सभापती, पंचायत समिती माळशिरस), शिवाजी भाऊ पाटील (अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर), अरूण बागनवर (कार्यकारी संचालक आदिनाथ स. सा. का. आदिनाथनगर) तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पै-पाहुणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close